Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 11 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
कोणावर किती विश्वास ठेवायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. जवळच्या लोकांची काळजी घ्या. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.
3 / 10
सुट्टीचा दिवस आहे तर आराम करा. शांतपणे गाणी ऐका आणि जीवनाचा आनंद लुटा. कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण राहील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.
4 / 10
नोकरी करणाऱ्या जातकांना सुट्टीच्या दिवशी काम करावं लागू शकते. त्यामुळे दिवसभर चिडचिड होईल. नवीन नोकरीचा विचार मनात सारखा येत राहील. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
5 / 10
येणारा काळ हा तुमचाच आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करत राहा. नक्कीच विजय मिळेल. सकारात्मक विचार करत राहा आत्मविश्वास वाढेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
नशिबाने आपल्याला काही गोष्टी मिळतात त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा हाती काहीच शिल्लक राहणार नाही. वेळ कोणासाठी थांबत नाही. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
7 / 10
भावंडांकडून नव्या वादाला तोंड फुटेल. आपण काहीच चूक केली नसताना काही प्रकरणांमध्ये ओढलं जाईल. त्यामुळे डोकं शांत ठेवाल तितकं चांगलं राहील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
आर्थिक स्थिती चांगली राहील. काही व्यवहारातून फायदा होईल. पण आर्थिक जोखिम पत्कारताना काळजी घ्या. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.
9 / 10
काही नाती जीवापेक्षा अधिक जपावी लागतात. कारण एकदा दुरावा निर्माण झाला की पुन्हा जुळून येणं कठीण असतं. जुळली तरी त्यात तो गोडवा नसतो. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.
10 / 10
आपल्यावर अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न हे लक्षात ठेवा. त्यामुळे तडकाफडकी निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा विचार करा. त्यांच्याकडून तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)