Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 18 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज दिवसभर एकटेपणा जाणवेल. आपण कोणाला फोन जरी केला तरी लोकं खूपच बिझी असल्याचं दाखवतील. त्यामुळे आपल्यासोबत कोणीच नसल्याचं भास होईल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
आज दिवसभर कुटुंबासोबत वेळ घालवाल. त्यामुळे तुम्हाला आत्मिक शांती लाभेल. आपल्यासोबत आपले कुटुंबियच उभे राहतात याची जाणीव होईल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
आपल्या कामाचा प्रभाव इतरांवर पडेल. त्यामुळे कुरापती वाढतील. उगाचच काही गोष्टींचा त्रास सहन करावा लागू शकतो. मित्रांसोबत वेळ व्यतित करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
बॉस मर्जीतला होता म्हणून आधी मज्जा मारली ते आता तुमच्यावर खार खातील. कारण तुमचं काम व्यवस्थित असल्याने जळफलाट होईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
काल परवापर्यंत आपल्यावर अवलंबून असलेले लोकं पाठ फिरवतील. गरत सरो आणि वैद्य मरो याची प्रचिती येईल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं सोनं करा. कारण संधी एकदाच मिळते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
आपण एखाद्याला मदत केली की त्याच्याकडून आपल्याला अपेक्षा असतात. पण नेमकं आपल्याला गरज असते तेव्हाच सर्व काही फिस्कटतं. मदत केलीच नाही असं दाखवलं जाईल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
आजचा दिवस एकदम मजेत जाईल. सकाळपासूनच सकारात्मक घडामोडी घडत असल्याने आनंदीत वाटेल. किचकट कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
आजचं जीवनमान खूपच वेगाने जात आहे. काल परवापर्यंत अशक्यप्राय वाटत असलेल्या गोष्टीही सहज होताना दिसतील. नव्याची साथ धरून पुढे जा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)