Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित रविवार 21 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज हाती घेतलेलं काम पूर्णत्वास नेण्याची संधी आहे. त्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी जोर लावा. कौटुंबिक स्तरावर आनंदाचं वातावरण असेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.
3 / 10
आर्थिक घडी विस्कटल्याचं अनुभूती आज येईल. त्यामुळे इतरांकडे पैसे मागण्याची वेळ येईल. आजचा अनुभव घेऊन पैसे गाठिशी ठेवा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.
4 / 10
आतापर्यंत केलेल्या चुका सुधारण्याची वेळ आहे. त्यामुळे शांतपणे विचार करून पुढची पावलं टाका. आपल्यामुळे कोण दुखावणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
5 / 10
आज एखाद्याकडून मदतीचा हात मिळू शकतो. त्यामुळे किचकट काम पूर्ण होईल. अहंकार एखाद्या कामात अडथळा आणू शकतो. त्यामुळे पाय जमिनीवर ठेवा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
व्यसनाच्या आहारी गेल्याने पैशांची उधळपट्टी झाल्याचं दिसून येईल. वेळीच सावध झाला नाही तर सर्वस्व गमवण्याची वेळ येईल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
7 / 10
कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. काम पूर्णत्वास नेण्यासाठी योजना आखा. पैशांची चिंता लागून राहील. बजेट बसवताना अक्षरश: दमछाक होईल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल. योग्य वेळी निर्णय घेण्यास टाळाटाळ केली तर भविष्यात फटका बसेल. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत गरजेची आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.
9 / 10
कुटुंबातील मतभेद टाळण्यासाठी पुढाकार घ्या. मागे जे काही झालं ते विसरून पुढे जा. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. मित्रांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.
10 / 10
कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. कोणीतरी येईल आणि आपल्याला भरवेल या अपेक्षेत राहू नका. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)