अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
दुसऱ्याच्या हाताखाली काम करून काहीच मिळणार नाही. स्वत:चं अस्तित्व तयार करा. वाणीवर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेऊ नका. दुःख मनात ठेवून पुढची वाटचाल करा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.
घाई न करता शांतपणे कामे करण्याचा प्रयत्न करा.तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा हेवा वाटू शकतो. चांगल्या शब्दांनी तुम्ही तुमच्या शत्रूंना गारद करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
आर्थिक अडचणीत सापडल्याने काही करावं सूचणार नाही. वरिष्ठांच्या मर्जीसाठी खूप आर्थिक नुकसान करून बसाल. कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्या. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.
दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणे योग्य नाही.त्यामुळे आपलं तितकं काम करा. दुसरा काय करतो याकडे लक्ष देऊ नका. वडिलांकडून कामात सहकार्य मिळेल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.
आपल्या कामाकडे लक्ष द्या मूर्खासारखे वागू नका. महिलां, वरिष्ठांशी बोलताना शब्द जपून वापरा. नोकरीच्या संधींच्या शोधात राहा. अधिकाऱ्यांकडून अपमान होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.
आज प्रेमप्रकरणात मोठी उलथापालथ होईल. सहज होकार मिळेल वाटत असताना अनपेक्षितपणे धक्का बसेल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.
आपल्याला असलेल्या आजाराचं निदान करण्यासाठी डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला तुमच्या भावाचे बोलणे पचवणे कठीण जाईल आणि राग येईल. पूर्वीच्या अनुभवावर कामं पूर्ण करा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.
मान्य केलेल्या कामासाठी निधीची कमतरता भासू शकते. संसार करताना अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी सल्ला घ्या. आजचा वेळ नातेवाईकांसाठी द्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
अनोळखी व्यक्तींचा वापर केवळ स्वार्थासाठी करणं चुकीचे आहे. यामुळे भविष्यात अडचणींचा डोंगर उभा कराल. आजच्या पराभवातून शिका. अनपेक्षित प्रवास थकवणारा ठरू शकतो. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)