Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 4 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
कोणतंही काम तडीस नेण्यापूर्वी समोरच्याच्या भावना लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण एखाद्याला दुखवून मिळवलेलं सुख काहीच कामाचं नसतं. उलट भविष्यात त्याचा त्रास होतो. शुभ अंक 9 आणि शुभ रंग निळा राहील.
3 / 10
आपण इतरांपेक्षा वेगळं आहोत आणि ग्रेट करत आहोत, अशा भ्रमात राहू नका. कामाशिवाय पर्याय नाही. गरजेवेळी कोणीही मदतीला येणार नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करा. शुभ अंक 28 आणि शुभ रंग पिवळा राहील.
4 / 10
गेल्या काही दिवसांपासून असलेली आर्थिक कोंडी फुटू शकते. त्यामुळे जीव भांड्यात पडेल. भविष्याची गरज ओळखून पैशांची बचत करा. आवडीचं काम करत राहा. शुभ अंक 8 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
आपल्या पाठीमागे बऱ्याच घडामोडी घडत असतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करा आणि सकारात्मक विचार करा. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. शुभ अंक 7 आणि शुभ रंग पांढरा राहील.
6 / 10
कौटुंबिक पातळीवर काही कारणास्तव तणावाचं वातावरण राहील. पत्नीसोबत काही वाद होतील. पण आई आणि पत्नीच्या भांडणात न पडलेलं बरं राहील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
7 / 10
भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला खटाटोप अखेर संपुष्टात येईल. आवडीची वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. उपयोगी असेल तर पैसे खर्च करा. शुभ अंक 17 आणि शुभ रंग जांभळा राहील.
8 / 10
आपली क्षमता किती आणि किती लांबपर्यंत मजल मारू शकतो याचा अंदाज घ्या. आधीच बाता मारण्यात वेळ घालवू नका. समाजात हासं होऊ शकतं. शुभ अंक 11 आणि शुभ रंग क्रीम राहील.
9 / 10
कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या. कारण एक चूक चांगलीच महागात पडू शकते. वाटल्यास तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. प्रयत्नांना अपेक्षित यश मिळेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
10 / 10
आज तुमच्या कामात बऱ्याच अडचणी येतील. होणारी कामंही काही कारणास्तव लांबणीवर पडतील. आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 31 आणि शुभ रंग नारंगी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)