Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 8 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
घरच्या कटकटीचा त्रास आपल्या कामावर होईल. आई वडिलांची चिंता लागून राहील. कामात लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
कामधंदा न करता नुसता विचार केल्याने काही होत नाही. कोणतीही योजना राबवण्यासाठी हाती पैसा हवा असतो. त्यामुळे हातात काही पुंजी जमा करा. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
कधी कधी लोकं आपल्या कर्तृत्त्वाचा गैरफायदा घेतात आणि त्याचा नंतर आपल्यालाच त्रास होतो. त्यामुळे काळजी घ्या. आर्थिक व्यवहार शहनिशा केल्याशिवाय करू नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
आजचा दिवस तुमच्या कामाचा राहील. हाती घेतलेलं काम पूर्ण कराल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. भविष्यातील काही योजना राबवू शकता. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
आलेल्या प्रत्येक अडचणींचा तितक्याच क्षमतेने सामना करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला एक वेगळीच उर्जा मिळते. तसेच अनुभवाचा फायदा होतो. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
नोकरीच्या ठिकाणी काही कारणास्तव मतभेद होऊ शकतात. त्यामुळे दिवस तणावात जाईल. घरीही त्रासदायक वातावरण राहील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
आज निर्णय घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणालाही शब्द देण्यापूर्वी विचार करा. नोकरी आणि व्यवसायाबाबत महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
कोणासमोरही व्यक्त होण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. कारण कोण आपला कसा फायदा घेईल हे सांगता येत नाही. यश मिळवण्यासाठी मेहनत घ्या. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
आपल्यात इतरांपेक्षा वेगळे गुण आहेत याची जाणीव ठेवा. त्या गुणांच्या माध्यमातून आर्थिक गणितं सोडवण्याचा प्रयत्न करा. खोटी आश्वासनं देणं टाळा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)