Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 9 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज तुमचा दिवस आनंदाने भरलेला असेल. तुम्हाला व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल.काही लोक तुम्हाला काही कामात त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. फास्ट फूड खाणे टाळावे. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
आज तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला आराम मिळेल.कुटुंबात तुमच्या गुणांची प्रशंसा होऊ शकते.तुमच्या व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
आज तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन गती प्राप्त करू शकता. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास तुमचा व्यवसाय सुधारू शकता.तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन लोकांसोबत भागीदारी करण्याची संधी मिळू शकते. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
आज नोकरीच्या ठिकाणी चांगली ऑफर मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.मोठ्या ठिकाणी परफॉर्म करण्याची संधी मिळू शकते. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्ही नवीन लोकांशी थोडे सावध राहावे लागेल.कोणताही मोठा व्यवहार करण्यापूर्वी तुम्हाला विचारपूर्वक पुढे जावे लागेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
नवीन प्रोजेक्ट्सवर काम करणारे आज आपली तयारी पूर्ण करतील.कोणीतरी तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कामाबद्दल तक्रार करू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
आज कोणतेही काम करताना वडिलांचा आशीर्वाद जरूर घ्या. काही नवीन काम सुरू करणार असाल तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या.तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
आज तुम्ही तुमच्या चुकांमधून काहीतरी नवीन शिकाल. थोड्या मेहनतीने तुम्हाला काही मोठे पैसे मिळवण्याची संधी मिळू शकते. तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस तुमच्या आवडत्या कामात घालवाल. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासने करावीत. शुभ अंक 14 आणि शुभ अंक लाल राहील.
10 / 10
आज तुमचा व्यवसाय खर्च तसेच वैयक्तिक खर्च यांच्यात समतोल राखा.करिअरच्या दृष्टीने गोष्टी सुधारण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काही कायदेशीर प्रकरणात मित्रांकडून मदत मिळेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)