Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 2 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जसं शक्य होईल तसा मागोवा घ्या. निश्चितच एक दिवस प्रयत्नांना यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पांढरा राहील.
3 / 10
गुप्तशत्रूंकडून वारंवार खुरापती केल्या जातील. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर सावध राहा. गरज पडल्यास वडिलधाऱ्या व्यक्तींची सल्ला घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग निळा राहील.
4 / 10
दिवसाची सुरुवात एकदम मस्त होईल. त्यामुळे कामं झटपट आटोपण्याचा प्रयत्न करा. किचकट कामंही चुटकीसरशी पूर्ण झाल्याने आनंदी व्हाल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
5 / 10
नोकरी करणाऱ्या जातकांना आजचा दिवस एकदम मस्त जाईल.नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक बदल दिसून येतील. नव्या प्रोजेक्ट सुरुवात करू शकता. शुभ अंक 10 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
6 / 10
कामाच्या ठिकाणी काही गोष्टींचा त्रास होईल. विनाकारण काही घडामोडींचा सामना करावा लागेल. दिवसभर मरगळ राहील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक 1 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर असतात. त्या पूर्ण करण्यासाठी वेळ खर्ची करू नका. त्या ऐवजी दुसरा पर्याय निवडा आणि पुढे जा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
नव वर्षात अनेक योजना या आपल्या भल्यासाठी आखल्याचं ठरवा. त्यानुसार रणनिती तयार करा आणि आर्थिक जोखिम घ्या. वडिलांसोबत वाद होऊ शकतो. शुभ अंक 4 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
आर्थिक चणचण दूर करणारा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकता. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. जवळच्या व्यक्तींचा रोष ओढावून घ्यावा लागेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
10 / 10
आसपास घडणाऱ्या घडामोडींच्या आपल्या मनावर परिणाम होतो. त्यामुळे काळजी घ्या. नकारात्मक गोष्टी दूर करून सकारात्मक गोष्टींकडे लक्ष ठेवा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)