Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 7 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. मित्राच्या मदतीने तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या मुलांसोबत घरी राहून चांगला वेळ घालवाल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.
3 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. थोडे कष्ट केल्याने तुम्हाला तुमच्या कामात लवकर यश मिळेल.जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.
4 / 10
आज घरी पाहुणे आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण होईल.कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, त्याबद्दल गांभीर्याने जाणून घेणे महत्वाचे आहे.आज ऑफिसमधील कर्मचाऱ्यांशी चांगली वागणूक ठेवा म्हणजे तुम्हाला तुमच्या कामात त्यांचे सहकार्य मिळेल. शुभ रंग 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
5 / 10
आज तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्याल. आज तुम्हाला दिलेले पैसे परत मिळतील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आज तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळेल. तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्याल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
7 / 10
आज कुटुंबियांकडून तुम्हाला तुमच्या व्यवसायात मदत करतील, ज्यामुळे जास्त फायदा होईल. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
आज तुमचे मन एखाद्या नवीन कामाकडे आकर्षित होईल.तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात मोठ्या उत्साहाने कराल. तुम्हाला ऑफिसमधील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.
9 / 10
आज तुमचा आत्मविश्वास चांगला राहील. प्रलंबित कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवविवाहित जोडप्यांना आज काही चांगली बातमी मिळेल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.
10 / 10
आज तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून विश्रांती घ्या आणि आत्मपरीक्षण करा. तसेच नविन कामाची सुरुवात करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. व्यसन केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या प्रियजनांसाठीही हानिकारक आहे, त्यामुळे ते करणं टाळा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)