Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 17 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस किचकट असा असेल. काही समस्यांना सामोरं जावं लागेल. काही वाईट घटना वाटेला येतील. तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
कौटुंबिक पातळीवर चिंतेचं वातावरण राहील. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. घरच्यांना काय हवं नको याची चाचपणी करून घ्या. दिवसाखेर सकारात्मक घडामोडी घडतील. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
रोजच्या सारखाच आजचा दिवस आहे. सततच्या कामामुळे थकून जाल. सहकार्यांसोबत काही क्षण मजेत जातील. चमचमीत जेवण असल्याने दिवस आनंदात जाईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. काही नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे भविष्यातील योजना आखता येतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
आज काही कामांचा त्रास होईल. होणारी कामं लांबणीवर गेल्याने दिवसभर अस्वस्थता राहील. जवळच्या व्यक्तींचा सहवास लाभेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
काही कामं अडली असतील तर ती आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला कामी येईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत करा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
नव्या उर्जेसह आजच्या दिवसाला सामोरं जा. मागे काय झालं ते सर्व विसरून जा. कठोर मेहनत घ्या. अपेक्षित यश तुम्हाला मिळेल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
आज घरच्यांसोबत जवळच्या प्रवासाला जाण्याचा योग जुळून येईल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे आठवणींना उजाळा मिळेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
आजच्या दिवसाची सुरुवात देवदर्शनाने करा. अध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहा. आपलं मन काय सांगतं याकडे लक्ष ठेवा आणि त्यानुसार कृती करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)