Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 20 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल.पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. ज्यातून तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.
3 / 10
आज जे काही काम हाती घ्याल ते वेळेवर पूर्ण कराल. कनिष्ठ देखील तुमच्या क्षमतेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.
4 / 10
करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. योग्य आणि चुकीचा फरक करूनच कोणताही निर्णय घ्या. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
5 / 10
आज नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे. कामात काही अडथळे येतील. तुमचे मन धार्मिक कार्यातही व्यस्त राहील. तुमच्या हट्टी स्वभावामुळे काही अडचणी येऊ शकतात. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आज तुमच्या शत्रूंचा पराभव होईल. घरातील ज्येष्ठांचे आरोग्य चांगले राहील. एखाद्यासोबत भागीदारी करून नवीन व्यवसाय सुरू करू शकता. आज तुम्ही कोणताही वाद टाळण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
7 / 10
आज कोणत्याही प्रकारे निष्काळजी होऊ नका किंवा कोणाशीही वाद घालू नका, संयम ठेवा.जे लोक सरकारी क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
आज तुमच्या विचारांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होईल. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि नातेवाईकांशी संबंध अधिक घट्ट होतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.
9 / 10
आज तुमचे खर्च नियंत्रणात राहतील. कुठूनतरी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.आत्मविश्वासाच्या जोरावर बरेच काही करू शकाल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.
10 / 10
आज काही नवीन महत्वाच्या लोकांशी भेट होईल. उच्च दर्जाचे व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. इतर स्रोतांमधून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबीयांचे मत घेणे प्रभावी ठरेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)