Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 24 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज तुमचा दिवस जबाबदाऱ्यांनी भरलेला असणार आहे. तुम्हाला वरिष्ठांकडून काही विशेष कामाची माहिती मिळेल.तुमचे उत्पन्न वाढले की तुमच्या जबाबदाऱ्याही वाढतील. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
आज तुम्हाला लोकांचा पाठिंबा तर मिळेलच, तसेच पुढे जाण्यासाठी प्रोत्साहनही मिळेल. तुम्हाला रोजगाराच्या नवीन संधी मिळतील.तुम्ही त्यांचा पुरेपूर फायदा घ्याल.आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल असेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
4 / 10
आज ऑफिसमधील मित्र तुमच्या प्रोजेक्टमुळे आश्चर्यचकित होतील.तुमची प्रलंबित कामे मित्राच्या मदतीने पूर्ण होतील. प्रॉपर्टी डीलर्सना आज मोठी डील मिळेल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात जास्त फायदा होईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
आज तुम्ही तुमच्या मुलाच्या प्रगतीने खूप आनंदी असाल. तुमच्या मनात काहीतरी नवीन करण्याची इच्छा जागृत होईल. तुम्हाला तुमच्या निर्णयात पूर्ण पाठिंबा मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल. तुम्ही वाहन किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करू शकता.आज तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील.शरीराला थोडा आराम द्या आणि अनावश्यक विचार टाळा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळत राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच यश मिळेल.ऑफिसमध्ये काही नवीन लोक भेटू शकतात. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
आज तुमचे काही मित्र तुम्हाला भेटायला घरी येऊ शकतात.कुटुंबातील सदस्य काही कामाबाबत तुमचा सल्ला घेतील. कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
आज तुम्ही तुमच्या कामाची क्षमता वाढवावी. यामुळे तुम्हाला अपेक्षित फायदे मिळतील.आज अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळावे.आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आज तुम्हाला आराम मिळेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.तुम्ही यशाकडे वेगाने वाटचाल कराल.कोणत्याही अनुभवी व्यक्तीचे मत घेतल्याशिवाय व्यवसाय सुरू करू नये. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)