Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 24 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
नोकरीच्या ठिकाणी तु्म्हाला आजचा दिवस एकदम मजेशीर जाईल. कामाचा लोड नसल्याने एकदम सुट्टीचा फील येईल. संध्याकाळी घरी आनंदी वातावरण असेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
3 / 10
काही नाती ही तळहाताच्या फोडासारखी असतात. त्यांना जपावं लागतं. आडेमुठेपणा महागात पडू शकतो. सामंजस्यपणे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.
4 / 10
कुटुंबाशिवाय मोठं असं काही नाही. त्यांची काळजी घ्या. कारण ऐनवेळी त्यांचीच मदत होणार असते. पैशांची बचत करा आणि भविष्याच्या योजना आखा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.
5 / 10
कामाच्या ठिकाणी एखादं किचकट काम चुटकीसरशी पूर्ण कराल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. काही नवीन आव्हानं पेलावी लागतील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
6 / 10
जवळच्या व्यक्तींवर विश्वास ठेवणं महागात पडू शकतं. त्यामुळे वेळीच सावध राहा. नाहीतर भविष्यात मोठा फटका बसू शकतो. स्वभाव शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.
7 / 10
आपल्या वागण्याचा इतरांना त्रास तर होत नाही ना ही काळजी घ्या. कधी कधी आपण भावनेच्या भरात बरंच काही करून जातो. पण त्यामुळे नाती तुटतात. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
आपलं उत्पन्न किती आणि खर्च किती करतो याचा तालमेल ठेवा. अन्यथा उसनवारी करण्याची वेळ येईल. उपयोगी नसलेल्या वस्तूंची खरेदी करू नका. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.
9 / 10
आज देवदर्शनाचा योग जुळून येईल. त्यामुळे मन एकदम प्रसन्न होईल. काही अक्रित घटनांमुळे व्यथित झालेलं मन थाऱ्यावर येईल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.
10 / 10
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बचत हे पहिलं पाऊल आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवून बचत करा. भविष्यात नक्कीच फायदा होईल. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)