Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 6 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज थोडी मेहनत केल्याने मोठा फायदा होईल. यामुळे ते दिवसभर आनंदी राहतील. आज तुम्हाला तुमच्या कामाचे सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या प्रियकरासाठी आजचा दिवस चांगला आहे. शुभ अंक 5 आणि हिरवा असेल.
3 / 10
आज कोणत्याही महत्त्वाच्या कामात जोडीदाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. नवीन प्रकल्पावर काम करण्यापूर्वी वडिलांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमची कामं वेळेपूर्वी करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 15 आणि पिवळा असेल.
4 / 10
आज तुमचा दिवस संमिश्र असेल. आर्थिक लाभाचे नवीन स्रोत दिसून येतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा योग जुळून येईल. तुमची काही कामं अपूर्ण राहू शकतात. शुभ अंक 6 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
5 / 10
आज आरोग्य चांगले राहील. ऑफिसमध्ये तुमच्या बॉसला प्रभावित करण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी खर्चाचा विचार करा. तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग जांभळा राहील.
6 / 10
आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्ही भविष्यासाठी केलेल्या योजनांचाही विचार करू शकता. हे आपले उद्दिष्ट साध्य करण्यात देखील मदत करेल. तुम्हाला यश मिळण्याची सर्व शक्यता आहे. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
7 / 10
आज ऑफिसमधील कामाचा पसरा पाहून मन खिन्न होईल. पण कामाशिवाय पर्याय नाही. आज एखादा जुना मित्र तुमच्या घरी येऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग नारंगी राहील.
8 / 10
आजचा दिवस कामातच जाईल. जेवण्याची उसंत मिळणार नाही. संध्याकाळी तुम्हाला थोडा शारीरिक थकवा जाणवू शकतो. तुमचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा, सर्वकाही चांगले होईल. आज तुम्हाला काही कामानिमित्त शहराबाहेर जावे लागेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
9 / 10
आज घरात आनंदाचे वातावरण असेल. कोणत्याही विशेष कामात पालकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला इच्छा नसतानाही एखाद्याला पैसे उधार द्यावे लागू शकतात. संयम ठेवा सर्व समस्यांवर सहज उपाय सापडतील. शुभ रंग 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.
10 / 10
आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रगतीच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. आज तुम्हाला एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)