Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 7 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आर्थिक जोखिम घेताना 100 वेळा विचार करा. कारण एकदा बाण सुटला की परत मागे घेता येत नाही. वडिलधाऱ्या व्यक्तींकडून सल्ला घेतला तर बरं राहील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.
3 / 10
घरात काही कारणावरून वाद होतील. कलह इतका टोकाला जाईल की अस्वस्थ व्हाल. दिवसभर कशात मन रमणार नाही. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
4 / 10
प्रत्येक कामात यश मिळेल असं होत नाही. पण आपण आपले प्रामाणिक प्रयत्न केले पाहीजेत. घराच्या डागडुजीकडे लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
आपण जेव्हा समोरच्याचं व्यवस्थितरित्या ऐकतो तेव्हा आपल्याला त्याच्या भावना कळतात. पण त्याचं ऐकलंच नाही तर आपल्याबाबत एक वेगळं मत तयार होतं. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आपण करत असलेल्या कामाला जर नशिबाची साथ मिळाली तर काहीच सांगायला नको. पैसा हाती खेळता राहील. त्यामुळे निर्णय घेताना भीती राहणार नाही. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.
7 / 10
अडचणीच्या काळात जो आपली मदत करतो तोच खरा मित्र असतो. हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे अडचण दूर झाली की पाठ फिरवू नका. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
नोकरीच्या ठिकाणी बऱ्यात विचित्र घडामोडी घडतील. पण त्याची काळजी करून फायदा नाही. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीकोनातून पावलं टाका. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.
9 / 10
आपण कसं वागतो यावरून समोरचा आपली किंमत करत असतो. त्यामुळे जितकं शांत राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न करा. मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
प्रेम प्रकरणात फटका बसू शकतो. ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तो पाठ फिरवताना दिसेल. अध्यात्मिक प्रगती या कालावधीत होईल. तसेच भविष्यातील मार्ग सापडतील. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)