Numerology : अंकशास्त्राचं गणित रविवार 30 एप्रिल रोजी कसं असेल? जाणून शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
शत्रूपक्षाकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण वाद घालण्यापेक्षा शांत राहण्याचा प्रयत्न करा. या काळात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होईल.शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.
3 / 10
आतापर्यंत आपल्या स्वकतृत्वाने मिळालेल्या गोष्टींचा लेखाजोखा घेण्याचा दिवस आहे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंतच्या प्रवासात मदत केली त्यांचे आभार माना. यामुळे भविष्यातील योजना आखणं आणखी सोपं होईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
4 / 10
कधी कधी जवळचे लोकं आपली फसवणूक करतात. आज त्याची जाणीव होईल. इतक्या दिवसात आपल्यासोबत नेमकं काय झालं हे आठवून मनात कल्लोळ निर्माण होईल. पण त्यावर मात करून नव्याने सुरुवात करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मानसन्मान हवा असेल तर तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवला पाहीजे. तर तुम्ही अपेक्षित यश मिळवू शकाल. विनाकारण कोणाशी वाद घालू नका. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
आपलं काम आपण केलेलं बरं राहील. दुसऱ्यावर अवलंबून राहीलं की त्रास होतो. त्यामुळे आपल्या कामाकडे लक्ष द्या आणि काम पूर्णत्वास न्या.शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.
7 / 10
तुमच्या खांद्यावर अचानकपणे जबाबदारी पडेल. पण घाबरून जाऊ नका. ती जबाबदारी समर्थपणे पेलण्याची तयारी ठेवा. कारण हा अनुभव भविष्यात कामी पडेल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
काही प्रश्न कितीही केलं तरी सुटत नाहीत. त्यामुळे त्याच्या मागे लागून वेळ वाया घालवू नका. देवाची पूजा अर्चना करा आणि नकारात्मक दृष्टीकोन दूर करा. त्यामुळे आनंदी वाटू लागेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा राहील.
9 / 10
कधी कधी भावनात्मक वागून चालत नाही. अनेकदा कठोर निर्णय घेणंही गरजेचं असतं. आज तुम्हाला तसंच वागावं लागेल. अन्यथा मोठं नुकसान करून बसाल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यास उत्तम दिवस आहे. पण निर्णय घेण्यापूर्वी एकदा तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. कोणालाही शब्द देण्यापूर्वी दहावेळी विचार कराल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी असेल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)