Numerology : गुरुवार 20 एप्रिल 2023 साठी अंकशास्त्राचं गणित कसं असेल? जाणून घ्या एका क्लिकवर
Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 19, 28 ही जन्मतारीख असेल तर 1, 1+9, 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मानसन्मान हवा असेल तर तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवला पाहीजे. तर तुम्ही अपेक्षित यश मिळवू शकाल. विनाकारण कोणाशी वाद घालू नका. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी असेल.
3 / 10
तुम्हाला आज बराच बदल झालेला दिसून येईल. मेहनतीचं अपेक्षित फळ तुम्हाला उपभोगायला मिळेल. न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग करडा राहील.
4 / 10
वडिलधाऱ्या माणसांचा सल्ला कधी कधी खूपच कामी येतो. अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. आरोग्य विषयक तक्रारी जाणवतील. कदाचित डॉक्टरकडे जाण्याची वेळ येईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
बदल हा काळाचा नियम आहे. तुम्ही जुन्या विचारांवर कधीच प्रगती साधू शकत नाही. त्यामुळे विचार बदलत नव्याने सुरुवात करा. काही अशक्य गोष्टी शक्य होतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.
6 / 10
आजचा दिवस त्रासदायक जाईल. एखादा छोटा अपघात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे घरात तणावग्रस्त वातावरण राहील. बॉसकडून अपमान सहन करावा लागेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. तसेच काही बाबींचा उलगडा झाल्याने मानसिक समाधान मिळेल. आयुष्यात यशाची एक पायरी नक्कीच चढाल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
कधी कधी भावनात्मक वागून चालत नाही. अनेकदा कठोर निर्णय घेणंही गरजेचं असतं. आज तुम्हाला तसंच वागावं लागेल. अन्यथा मोठं नुकसान करून बसाल. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
तुमच्या कामाचं मूल्यांकन करणारा हा दिवस राहील. कारण तुम्ही आतापर्यंत केलेल्या कामाचं फळीत देणारा दिवस आहे. त्यामुळे दिवसभर आनंदी राहाल. कौटुंबिक वातावरणही सकारात्मक राहील. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
आपलं काम आपण केलेलं बरं राहील. दुसऱ्यावर अवलंबून राहीलं की त्रास होतो. त्यामुळे आपल्या कामाकडे लक्ष द्या आणि काम पूर्णत्वास न्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हलका पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)