Numerology : गुरुवार 27 एप्रिल 2023 हा दिवस अंकशास्त्राचा दृष्टीने कसा असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि रंग
Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
दिवसभर तुम्हाला आत्मविश्वासाची उणीव भासणार आहे. उत्साह चांगला असल्याने कामंही झटपट होतील. नव्या ओळखी होतील. तसेच ओळखीतून दोन कामं मिळतील. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.
3 / 10
कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून डोक्यावर असलेला भार हलका होईल. स्वत:वर विश्वास ठेवा आणि काम करत राहा. यामुळे भविष्यात फायदा होईल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग करडा राहील.
4 / 10
कठीण परिश्रमाच्या पुढे सर्व काही उणे असतं. तात्काळ फळ जरी मिळालं नाही तर पुढे जाऊन निश्चितच फायदा होईल. तुमच्या कामामुळे वरिष्ठ खूश होतील. तसेच त्यांचं मार्गदर्शन कामी येईल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.
5 / 10
तुमच्या नेतृत्व गुणांना वाव मिळेल. तसेच तुम्ही आखलेली योजना फळास येईल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. मात्र काहीतरी भीती मनात राहील. पण काळजी करून काही उपयोग नाही. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रिम राहील.
6 / 10
गुरुवारचा दिवस प्रवासाचा राहील. कामानिमित्त प्रवास करणं भाग पडेल. मात्र कामं होत असल्याने आनंदी व्हाल. जुने आजार डोकं वर काढेल त्यामुळे काळजी घ्या. करिअरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
अचानक धनलाभ होईल त्यामुळे मनावरील ताण दूर होईल. तसेच आर्थिक गणित सुटल्याने कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. शत्रूपक्षही तुमच्या स्थितीमुळे दोन पावलं मागे येईल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.
8 / 10
सर्वच दिवस सारखे नसतात, त्याची प्रचिती आज तुम्हाला येईल. जवळचे समजणारे लोकंच तुम्हाला लांब करतील. त्यामुळे दु:ख वाटेल. पण या गोष्टी मागे सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.
9 / 10
कोणतंही काम जोखीम घेतल्याशिवाय फळास येत नाही. त्यामुळे जोखीम घेणं भाग आहे. पण आर्थिक गणित सांभाळून निर्णय घ्या. अन्यथा फटका बसू शकतो. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.
10 / 10
तुम्ही कामाचा मोबदला देणार हा दिवस आहे. चांगलं गिऱ्हाईक आल्याने तुम्हाला फायदा होईल. पैशांची बचत करा, अवास्तव खर्च करणं टाळा. भविष्यात पैशांची गरज भासू शकते. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लेमन राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)