Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 3 मे रोजी कसं असेल? जाणून शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
आज तुमच्या मनासारख काम होईल. त्यामुळे आनंदी राहाल. वरिष्ठांकडून कौतुकाची थाप पाठीवर पडेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.
3 / 10
काही गोष्टींचा आपल्याला उशिराने फायदा होतो. आज त्याची प्रचिती येईल. अचानकपणे धनलाभ झाल्याने आश्चर्य वाटेल. पण हे मागच्या कर्माचं फळ आहे लक्षात ठेवा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.
4 / 10
संकट सांगून येत नाहीत अचानकपणे येतात. त्यामुळे धीर सोडू नका. खंबीरपणे उभे राहा आणि आलेल्या संकटाचा सामना करा. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना चिंता नसते. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.
5 / 10
रोजच्या आयुष्यात काही ना काही घडत असतं. त्यामुळे आलेल्या गोष्टींना सामोरं जा. कारण त्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. कारण संकट ओसरलं की खरी सुरुवात होते. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.
6 / 10
कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. काही गोष्टींची नव्याने माहिती मिळेल. या माहितीचा तुम्हाला फायदा होईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.
7 / 10
जवळच्या लोकांकडून कधी फसवणूक होते. त्यामुळे असा फटका बसला तर ढासळू नका. नव्याने सुरुवात करा. हा अनुभव तुम्हाला नक्कीच शिकवेल. त्यामुळे आर्थिक व्यवहारांची जाण होईल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.
8 / 10
मित्रांसोबत आनंदी क्षण व्यतित करण्याचा दिवस आहे. काही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. त्यामुळे मन भरून येईल. काही गोष्टी तुम्हाला उशिराने कळल्याने दु:ख जाणवेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.
9 / 10
आज दिवसभर विनाकारण तुम्हाला अस्वस्थ वाटेल. कसलीतरी भीती तुमच्या मनात घर करून राहील. त्यामुळे काळजी करू नका. वाटल्यास आपल्या मित्र किंवा कुटुंबासोबत माहिती शेअर करा. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.
10 / 10
शक्तिपेक्षा युक्ती श्रेष्ठ याची प्रचिती आज तुम्हाला येईल. मेहनत करून तुम्हाला जे यश मिळालं नाही. ते यश तुम्हाला बुद्धिच्या जोरावर सहज मिळेल. त्यामुळे आजचा दिवस बुद्धिने काम करण्याचा आहे. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)