Krishna Janmashtami 2023: जन्माष्टमीला 30 वर्षानंतर घडून येणार असा योग, तीन राशींसाठी ‘अच्छे दिन’
Krishna Janmashtami 2023: श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला गोपाळकाला साजरा केला जातो. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी उत्सव 6 आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे.
1 / 6
कृष्ण जयंतीचा उत्सव 6 सप्टेंबर रोजी सुरु होणार असून या दिवशी उपवास ठेवणं शुभ राहील. यासोबत साधु आणि ऋषी 7 सप्टेंबरल जन्माष्टमीचं व्रत ठेवतील.
2 / 6
30 वर्षानंतर शनिदेव आपल्या स्वराशीत आहेत. तसेच शनिदेव हे कृष्णाचे परम भक्त मानले जातात. त्यामुळे हा योग खास असणार आहे. तसेच जन्मष्टमीली सर्वार्थ सिद्धी योग आहे.
3 / 6
चंद्रही वृषभ राशीत असेल आणि भगवान कृष्णच्या वेळी असलेलं रोहिणी नक्षण असणार आहे. त्यामुळे ही जन्माष्टमी खास असणार आहे. यामुळे काही राशींचं नशिब चमकणार आहे.
4 / 6
जन्माष्टमीच्या दिवशी वृषभ राशीच्या जातकांना विशेष लाभ होणार आहे. मोठ्या कामात अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती दिसून येईल.
5 / 6
ग्रहांची स्थिती आणि भगवान कृष्णांच्या आशीर्वादाने उत्पन्नात चांगली वाढ होईल. गेल्या काही दिवसांपासून घरात सुरु असलेले वाद संपुष्टात येतील. व्यवसायात प्रगती दिसून येईल.
6 / 6
मकर राशीच्या जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. पगारवाढ होऊ शकते. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)