आपल्या पैकी काही लोक हे खूप क्रिएटिव्ह असतात, त्यांच्याकडे अलौकिक बुद्धिमत्ता असते. त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा नेहमीच एक वेगळा दृष्टीकोन असतो. ते त्यांच्या भिन्न विचाराने सर्वांना चकित करतात. ते बऱ्याचदा वेगळा विचार करत असल्याने त्यांची गणना ही वेगळं व्यक्तीमत्त्व म्हणून केली जाते. या राशींच्या लोकांकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते.
वृश्चिक राशीच्या व्यक्ती या फार रहस्यमय आणि शांत असतात. कारण लोक जे काही करतात , ते त्याचे निरीक्षण करतात. ते फार संवेदनशील असतात. विशेष म्हणजे एखाद्याची ताकद आणि कमजोरी या दोन्ही गोष्टीची माहिती ते काढतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्या कडे असते. आणि नसेल तर ते उत्तर शोधण्याचा ते प्रयत्न करतात.
कन्या राशीची लोक सर्व गोष्टींबद्दल फार उत्सुक असतात. त्यांना प्रत्येक गोष्टींवर प्रश्न पडतात. तसेच ते शिकण्यास नेहमी उत्सुक असतात. त्यांचा कोणत्याही गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन हा कल्पक आणि वेगळा असतो. अनेक अशक्य समस्यांचे निराकरण करण्याचा ते प्रयत्न करतात. या राशींच्या लोकांकडे प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असते.
कुंभ राशीचे व्यक्ती हे जुळवून घेण्यात आणि नवीन कल्पना रंगवण्यात फार हुशार असतात.ते नेहमी वस्तुस्थितीकडे एका वेगळ्या नजरेने पाहतात. ते नाविन्यपूर्ण आणि कोणतीही गोष्ट पटकन स्वीकारतात. प्रश्नावर उत्तर शोधण्याचा ते प्रयत्न करतात.
मीन राशीच्या व्यक्ती या अत्यंत क्रिएटिव्ह आणि नाविन्यपूर्ण असतात. त्यांच्याकडे कल्पनाशक्ती असते. तसेच ते विविध कल्पनांनी परिपूर्ण आहेत. त्यांच्याकडे भावनिक बुद्धिमत्ता अधिक असते. ते अनुभवी असतात. त्याच्या अनुभवाच्या जोरावर ते आयुष्यातील प्रश्न सोडवतात. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)