IPL 2024 : आयपीएलपूर्वी विराट कोहलीच्या संघाचं नाव बदलणार, काय आणि का ते जाणून घ्या

| Updated on: Mar 13, 2024 | 3:01 PM

आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ सज्ज आहे. नव्या बदलांसह संघांनी तयारी सुरु केली आहे. काही संघांच्या जर्सीत, काही संघांच्या प्लेयर्स, काही संघांच्या कर्णधार बदलले गेले आहेत. आता विराट कोहली खेळत असलेला संघ नव्या नावासह समोर येणार आहे.

1 / 6
आयपीएलच्या 17 व्या पर्वाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यापासून होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीचा संघ नव्या नावासह उतरणार आहे. त्यामुळे अनेकांना उत्सुकता लागली आहे की, नेमका काय बदल होणार ते..

2 / 6
आयपीएलमध्ये आरसीबी नावाने प्रचलित असलेला संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर नावाने खेळत होता. आता या संघाचं नाव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु असं असणार आहे. चेन्नस्वामी स्टेडियमवर 19 मार्च रोजी या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

3 / 6
आरसीबीचे चाहते गेल्या अनेक वर्षांपासून नावात बदल करण्याची मागणी करत होते. आता फ्रेंचायसीने त्यांचं म्हणणं ऐकलं असून नव्या नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे या पर्वात चाहतेही खूश होणार आहेत.

4 / 6
आयपीएलच्या 17 व्या पर्वात आरसीबीला या नाव बदलाचा फायदा होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. गेल्या 16 पर्वात आरसीबीची झोळी रितीच आहे. त्यामुळे चाहते पहिल्या जेतेपदाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

5 / 6
22 मार्च 2024 रोजी आयपीएलमधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या सामन्यापासून आयपीएलच्या 17 व्या पर्वाला सुरुवात होणार आहे.

6 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार दीपराज, मोहम्मद वैशाख, मोहम्मद अकादमी. , मोहम्मद सिराज, रीस टोपली, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करण, लकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.