Astrology May 2023 : मे महिन्यात ग्रहांची साथ मिळणार का? जाणून घ्या मासिक ज्योतिष फळ आणि उपाय

| Updated on: Apr 27, 2023 | 2:39 PM

Astrology : एप्रिल महिना संपत आला असून आता मे महिन्याचे वेध लागले आहेत. मे महिन्यात आपल्या राशीला कसं ग्रहमान असेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात

1 / 13
इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे मे हा पाचवा महिना आहे. या महिन्यात वैशाख आणि ज्येष्ठ असे मराठी महिने असतील. या महिन्यात शुक्र, मंगळ आणि सूर्य ग्रह राशी बदल करणार आहे. तर गुरु आणि राहुमुळे मेष राशीत चांडाळ योग तयार झाला आहे. शनि आपल्या स्वराशीत विराजमान आहे. चला जाणून घेऊयात याचा राशीचक्रावर कसा परिणाम होईल.

2 / 13
मेष राशीच्या जातकांना महिन्याची सुरुवात दमदार होईल. त्यामुळे पूर्ण महिनाभर उत्साह दिसून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं असल्याने प्रसन्नता वाढेल. पण या काळात इतरांना आपल्यामुळे दु:ख होईल असं वागू नका. काही गोष्टी सोडून दिल्या तर बलं होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. या महिन्यात दररोज शिवलिंगवार दूध आणि जल अर्पण करा. तसेच रुद्राष्टकाचं पठण करा.

3 / 13
वृषभ राशीच्या जातकांना मे महिन्यात संमिश्र परिणाम दिसून येतील. सुरुवातीला काही चांगल्या घडामोडी घडतील. पण मध्यापर्यंत थोडं तणावपूर्ण स्थिती राहील. उत्तरार्धात तुम्हाला न्यायालयीन प्रकरणात यश मिळताना दिसेल. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अन्यथा मोठा फटका बसू शकतो. घरात पारद शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा करा.

4 / 13
मिथुन राशीच्या जातकांना गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होताना दिसतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची तुम्हाला चांगली साथ मिळेल. जमिन किंवा घर खरेदीचा योग आहे. तिसऱ्या आठवड्यात मात्र तुम्हाला हितशत्रूंचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करा. अन्यथा मोठा फटका बसू शकतो. दररोज विष्णुंना पिवळं फूल अर्पण करा, तसेच तुळसीपत्र वाहून विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा.

5 / 13
कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना तणावपूर्ण राहील. काही कामं होता होता राहतील. काही गोष्टींसाठी तुमच्या खिशातून अतिरिक्त पैसे खर्च होतील. काही ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते. करिअरमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात फटका बसू शकतो. मात्र उत्तरार्धात गाडी पुन्हा एकदा रुळावर येईल. आलेल्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. घरी श्वेतार्क गणपतीची स्थापना करा आणि दररोज गणेश चालीसेचं पठण करा.

6 / 13
सिंह राशीच्या जातकांना अशक्यप्राय गोष्टी शक्य होताना दिसतील. या काळात एखादं मोठं आव्हान पेलाल, अशी ग्रहस्थिती आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडेल. पगारवाढ आणि पदोन्नती होण्याची शक्यता आहे. सरकारी कामंही पटापट होताना दिसतील. कुटुंबासोबत पर्यटनाला जाण्याचा योग आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल. कुटुंबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. दररोज सूर्याला अर्घ्य द्या आणि भगवान विष्णुच्या मंत्राचा जप करा.

7 / 13
कन्या राशीच्या जातकांना मे महिन्यात काही चांगल्या बातम्या कानावर येतील. त्यामुळे सुरुवात आनंदी होईल. जागेशी निगडीत वाद दूर होतील. काही ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्य विषयक काही समस्या डोकं वर काढतील. त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करा. वैवाहिक जीवनात तुम्हाला सकारात्मक बदल दिसेल. दररोज गणपतीला दूर्वा अर्पण करा आणि चालीसा पठण करा.

8 / 13
तूळ राशीसाठी ग्रहमान संमिश्र राहील. काही सुखाचे, तर काही दु:खाचे क्षण वाटेला येतील. दुसऱ्या आठवड्यात काही कामं पूर्ण होतील. पण नोकरीच्या ठिकाणी डोक्यावर अतिरिक्त भार पडेल. काही छोट्या मोठ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. अन्यथा फटका बसू शकतो. न्यायालयीन प्रकरणात विनाकारण त्रास होईल. गुंतवणूक करताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवन सामान्य राहील. दररोज देवी दुर्गेची पूजा करा आणि मंत्र जाप करा.

9 / 13
वृश्चिक राशीच्या जातकांनाही चढउतार असलेला हा महिना आहे. काही गोष्टी कितीही टाळल्या तरी होणारच असतात. त्यामुळे काळजी न करता पुढे जात राहण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून साथ मिळेल. पण काही सरकारी कामं मात्र अडकतील असं ग्रहमान आहे. कठीण काळात तुम्हाला जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील. दररोज हनुमानाची पूजा आणि बजरंग बाण पठण करा.

10 / 13
धनु राशीच्या जातकांना हा महिना फलदायी ठरणार आहे. नुकतीच साडेसातीतून सुटका झाल्याने काही कामं झटपट होताना दिसतील. प्रमोशन किंवा एखादी शुभ बातमी तुम्हाला या काळात मिळेल. पंधरवड्यानंतर मात्र रागावर नियंत्रण ठेवा. कारण आपल्या कठोर वाणीमुळे एखाद्याच्या भावना दुखवू शकतात. त्यामुळे भविष्यात त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे काळजी घ्या. रोज सूर्यदेवांना अर्घ्य द्या आणि आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा.

11 / 13
मकर राशीच्या जातकांना मनासारखी परिणाम मिळवण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतील. काही कामात अडथळा आल्याने त्रास होईल. कठीण प्रसंगात एक एक पाऊल सावधपणे टाकणं गरजेचं आहे. आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. या काळात एखादा मोठा निर्णय घेऊ नका. विवाहीत लोकांनी आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मुलांशी निगडीत काही समस्या डोकं वर काढतील. रोज हनुमंताची पूजा करा आणि सुंदरकांडचं पठण करा.

12 / 13
कुंभ राशीच्या जातकांना हा महिना संमिश्र फळं देणारा आहे. महिन्याची सुरुवात खराब झाली तर उत्तरार्धात चांगली फळं मिळतील. गेलं ते गेलं असं समजून नव्याने सुरुवात करा. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीकोनातून नवी वाट सापडेल. प्रेम संबंधांसाठी हा महिना शुभ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. कुटुंबाची संकटात चांगली साथ लाभेल. आरोग्य ठिकठाक राहील असं ग्रहमान आहे. घरी श्वेतार्क गणपतीची स्थापना करा आणि गणेश चालिसेचं पठण करा.

13 / 13
मीन राशीसाठी हा महिना आव्हानात्मक असेल. सर्वच बाजूने संकटांचा मारा झाल्याने हतबल व्हाल. जवळच्या व्यक्तीकडून दगाफटका झाल्याने व्यतित व्हाल. अनावश्यक कामासाठी पैसा खर्ची होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती एकदम खराब राहील. पण या काळात जास्त उसनावारी करू नका. अन्यथा कर्जाच्या ओझ्याखाली राहाल. वैवाहिक जीवनात कलह निर्माण होईल. पण संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. रोज भगवान विष्णुची पूजा आणि त्यांच्या मंत्रांचा जप करा. तसे कपाळावर केसर टीळा लावा. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)