नवीन जॉबच्या शोधात आहात? नोकरीत बढती हवी आहे? मिळलीच म्हणून समजा ! या 5 राशींच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा
शनिवार 22 जानेवारीला शनिदेवाचा अस्त झाला होता आणि आता तो 24 फेब्रुवारीला उगवणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह उगवतो किंवा मावळतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. अशा स्थितीत शनिदेवाच्या उदयाचा सर्व राशींवरही प्रभाव पडेल, परंतु काही राशींसाठी शनिदेवाचा उदय शुभ ठरेल. चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल.
1 / 5
कर्क : शनिचा उदय होणार आहे. सातवे घर वैवाहिक जीवन आणि भागीदारीशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत, या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. तसेच भागीदारीच्या कामातही भरपूर यश मिळेल. लग्ननाचा विचार करत असाल तर लग्न नक्की जमेल.
2 / 5
मेष : या राशीमध्ये शनीचा उदय होणार आहे. यापूर्वीचा या राशीतस मंगळ विराजमान आहे. अशा स्थितीत शनि-मंगळाच्या संयोगाने येत्या काळात आनंद निर्माण होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल. पगारदार लोकांना प्रमोशनचा लाभ मिळू शकतो. जर नवीन नोकरीच्या शोधात असाल तर मिळालीच म्हणून समजा.
3 / 5
वृषभ : येणारा काळ वृषभ राशीसाठी लाभदायक असणार आहे. शनीच्या उदययामुळे या राशीसाठी आनंद निर्माण होईल. शनि उदयाच्या काळात व्यवसायात प्रचंड नफा होईल. कोणत्याही कामात हात लावलात तरी यश मिळेल. लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी परिस्थिती निर्माण होईल.
4 / 5
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांवर कुंभ राशीचा जबरदस्त प्रभाव राहील. या राशीवर शनीचे राज्य आहे. अशा स्थितीत शनीच्या उदयामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
5 / 5
तूळ : तूळ राशीच्या चौथ्या घरात शनिचा उदय होईल. चतुर्थ घर हे वाहन सुख, माता आणि भवनाचे मानले जाते. अशा परिस्थितीत या काळात आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल. आचानक धनलाभ होईल. नोकरीतील कामगिरी चांगली राहील. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)