Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा लाल रंगाच्या लेहेंग्यामधील किलर लुक; चाहत्यांनी कमेंटस करत केले कौतुक
साऊथ चित्रपटांव्यतिरिक्त रश्मिका मंदाना 'मिशन मजनू'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय तिच्या 'गुड बाय' या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये ती अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे
1 / 5
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. आपल्याच्या चाहत्यांना आपल्या विषयीचे अपडेट देताना दिसून येते. आ अनेकदा रश्मिका तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते. दरम्यान, रश्मिका मंडनाचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये तिने लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे.
2 / 5
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना अलीकडेच Indian Couture Week च्या 15 व्या एडिशनचा भाग बनली आहे. यामध्ये तिने वरुण बहलने डिझाईन केलेल्या लाल फ्लोरल लेहेंग्याचा आऊटफीट कॅरी केला होता . यामध्ये रश्मिका खूपच सुंदर दिसत होती.
3 / 5
रश्मिका मंदानाने शो स्टॉपर म्हणून रॅम्पवर अशा प्रकारे वॉक केले की सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. अतिशय आत्मविश्वासपूर्ण शैलीत रॅम्प वॉक करताना रश्मिका मंदान्नाने आपल्या स्टाईलने स्टेज गाजवले.
4 / 5
व्यावसायिक पातळीवर बोलायचे झाल्यास रश्मिका मंदानाचे चाहते तिच्या व अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटावर काम सुरू झाले असून लवकरच अपडेट समोर येईल.
5 / 5
साऊथ चित्रपटांव्यतिरिक्त रश्मिका मंदाना 'मिशन मजनू'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय तिच्या 'गुड बाय' या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये ती अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 7ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे