World Child Day: जागतिक बाल दिवसानिमित्त राष्ट्रपती भवनावर आकर्षक रोषणाई करण्यात आलीय. दरवर्षी 20 नोव्हेंबरला जागतिक बाल दिवस साजरा केला जातो.
जागतिक बाल दिवस साजरा करण्यास 1954 पासून सुरुवात झाली. पश्चिम बंगालमधील हावडा ब्रीजवर यानिमित्तानं आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.
बालकल्याण, लहान मुलांवरील अत्याचारांना विरोध याबाबात जनजागृती करण्यासाठी जागतिक बाल दिवस साजरा केला जातो.
जागतिक बाल दिवस 20 नोव्हेंबरला साजरा केला जातो तर भारतात पहिले पंतप्रधान पंडित जवारहलाल नेहरु यांच्या जंयतीनिमित्त 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्रांमध्ये 20 नोव्हेंबर 1959 रोजी बाल हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला गेला. कोरोना विषाणू संसर्गामुळे जागतिक बाल हक्कांचा प्रश्न निर्माण झाल्याचे ट्विट युनिसेफनं केले आहे.