Marathi News Photo gallery Raw vegetables are full of nutrition , you must include these veggies in diet for good health benefits
कांदा, मुळा भाजी… कच्ची खावी ताजी ! या भाज्या शिजवण्यापेक्षा कच्च्याच खाणे ठरते फायदेशीर
काही भाज्यांचे कच्चे सेवन करणे फायदेशीर ठरते, कारण त्या भाज्या शिजवल्यानंतर त्यातील पोषक गुणधर्म नष्ट होऊ शकतात. कोणत्या भाज्या कच्च्या खाव्यात हे जाणून घेऊया.
1 / 6
निरोगी आहाराचा विचार केला जातो तेव्हा कच्च्या भाज्या सॅलॅड्सच्या स्वरूपात खाणे फायदेशीर मानले जाते. त्यात शिजवलेल्या अन्नापेक्षा अधिक पोषक तत्वं असतात, ज्याचा आपल्या शरीराला अधिक फायदा होऊ शकतो. कच्च्या भाज्या केवळ आपल्या शरीरासाठीच फायदेशीर नसतात तर अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवण्यासही मदत करतात. त्यामध्ये फायबर, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, तसेच कॅलरीज कमी असतात. कोणत्या भाज्या कच्च्या खाव्यात हे जाणून घेऊया. मात्र तुम्हाला कोणतीही समस्या येत असेल तर हे पदार्थ कच्चे खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
2 / 6
कच्चा कांदा हा पोषक तत्वांचे पॉवरहाऊस मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर, फ्लेव्होनॉइड्स आणि सल्फ्यूरिक घटक मुबलक प्रमाणात असतात. सल्फ्यूरिक एन्झाइममुळे कांदा कापताना डोळ्यांमध्ये जळजळ होते व पाणी येते. कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने स्ट्रोक, हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होते.
3 / 6
कच्चं लसूण खाल्ल्याने रक्तातील साखर, मानसिक आरोग्य, चांगली स्मरणशक्ती, कोलेस्टेरॉलची पातळी आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. अभ्यासानुसार, कच्चा लसूण अँटिऑक्सिडेंट आणि सल्फ्यूरिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी देखील कार्य करतो. कच्च्या लसणात अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म देखील असतात.
4 / 6
सिमला मिरची कच्ची खाल्यास त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीरातील दैनंदिन पुरवठा सहजपणे पूर्ण करते. त्यात व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात.
5 / 6
जलकुंभी म्हणजेच वॉटर ग्रासलाही सुपरफूड म्हटले जाते. पोषक तत्वांच्या दृष्टीने जलकुंभी अतिशय आरोग्यदायी आहे. जर तुम्ही ते अंकुरित करून ते खाल्ले तर त्यात असे अनेक एन्झाइम तयार होतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
6 / 6
कच्ची ब्रोकोली देखील सुपरफूडच्या श्रेणीमध्ये येते, जी कॅन्सरच्या पेशींशी लढण्यासाठी, कमी रक्तदाब, मधुमेह, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हृदय चांगले ठेवण्यासाठी अनेक पटींनी फायदेशीर ठरते. आहे. कच्च्या ब्रोकोलीमध्ये शिजवलेल्या ब्रोकोलीपेक्षा दहापट जास्त सल्फोराफेन असू शकते ज्यामुळे त्याचे गुणधर्म अनेक पटींनी वाढू शकतात.