Paytm : पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई! ‘या’ सुविधा बंद करण्याचा घेतला निर्णय
पेटीएम पेमेंट बँकवर आरबीआयने कारवाईचा बडगा उचलला आहे. आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकवर डिपोझिट घेण्यास बंदी घातली आहे. 29 फेब्रुवारीपासून पेटीएम पेमेंट बँक ग्राहकांना बँकिंग सुविधा घेता येणार नाहीत. तसेच क्रेडीट व्यवहारांवरही बंदी घातली आहे.
1 / 6
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँकवर कठोर कारवाई करत सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रेडिट व्यवहार, टॉप-अप सुविधा, वॉलेट आणि फास्टॅगसह सर्व प्रकारच्या सुविधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पेटीएम पेमेंट बँक नवीन ग्राहक जोडू शकणार नाही.
2 / 6
पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकांच्या खात्यांमध्ये, प्रीपेड इंस्ट्रुमेंट्स, वॉलेट आणि फास्टॅगमध्ये ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारण्यास मनाई केली आहे.
3 / 6
पेटीएम पेमेंट बँकेने वारंवार नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं आहे. नियमांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने आरबीआयने हे कठोर पाऊल उचलले आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ऑडिटमध्ये अनेक उणिवा दिसून आल्या आहेत.
4 / 6
कोणत्याही मोठ्या निर्णयाचा फटका त्या त्या शेअर्सवर बसतो. पेटीएमच्या शेअर्सवरही आरबीआयच्या या कारवाईचा परिणाम दिसून येईल, यात शंका नाही. आता कुठे पेटीएमच्या शेअर्समध्ये सुधारणा होत होती, आता या बातमीने पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
5 / 6
पेटीएमचा ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा 221.7 कोटी रुपयांवर घसरला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यात बरीच घट दिसून आली होती. एका वर्षापूर्वी याच कालावधीत 392.1 कोटी रुपये तोटा होता.
6 / 6
हे निर्बंध फक्त पेटीएमच्या पेमेंट्स बँकेवर आहे. इतर सर्व UPI व्यवहार सेवा पेटीएम ॲपमध्ये उपलब्ध आहेत. पेटीएम स्कॅन करून पेमेंट करता येते. तुम्ही वीज, पाणी इत्यादी बिले साधारणपणे भरू शकता.