लाल, निळा, हिरवा… ट्रेनच्या वेगवेगळ्या रंगांच्या डब्यांचा अर्थ काय?

| Updated on: Jun 19, 2022 | 3:52 PM

ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे डबे नक्कीच पाहिले असतील, या डब्यांचे रंग वेगळे का असतात, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? यालाही कारण आहे. पॅसेंजर ट्रेनपासून सुपरफास्ट ट्रेनपर्यंतचे रंग वेगळे का असतात, जाणून घ्या त्यामागील कारणं...

1 / 5
भारतीय रेल्वे हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे डबे नक्कीच पाहिले असतील, या डब्यांचे रंग वेगळे का असतात, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? यालाही कारण आहे. पॅसेंजर ट्रेनपासून सुपरफास्ट ट्रेनपर्यंतचे रंग वेगळे का असतात, जाणून घ्या त्यामागील कारणं...

2 / 5
सर्वात सामान्य रंगाबद्दल बोलायचं झालं तर, निळ्या रांगच्या ट्रेन सर्वात जास्त दिसून येतात. त्यांना इंटिग्रेटेड कोच म्हणतात. अशा कोच असलेल्या ट्रेनचा वेग ताशी 70 ते 140 किलोमीटर असतो. हे डब्बे लोखंडाचे बनलेले असून त्यात एअरब्रेक आहेत. म्हणूनच ते मेल एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट ट्रेनमध्ये वापरले जातात.

3 / 5
 ट्रेनमध्ये लाल रंगाचे डबेही वापरले जातात. त्याला लिंक हॉफमन (Link Hoffmann)  असंही म्हणतात. हे खास प्रकारचे डबे आहेत, जे जर्मनीमध्ये तयार करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेने 2000 साली भारतात असे डबे आयात केले. सध्या ते आता पंजाबमधील कपूरथला येथे तयार केले जात आहेत.

4 / 5
 लाल डबे अॅल्युमिनियमचे बनलेले आहेत आणि इतर डब्यांच्या तुलनेत त्यांचे वजन कमी आहे. त्यांच्याकडे डिस्क ब्रेक आहेत. हा कोच वजनाने हलका असल्याने ताशी 200 किमी वेगाने धावतो. राजधानी आणि शताब्दी सारख्या गाड्यांमध्ये असे लाल डबे बसवण्यात आले आहेत जेणेकरून ते अधिक वेगाने पळतील.

5 / 5
याशिवाय हिरव्या रंगाचे डबेही आहेत. ते भारतीय रेल्वेच्या गरीब रथ ट्रेनमध्ये बसवण्यात आले आहेत. अशा प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनसाठी वेगवेगळ्या रंगाचे ट्रेनचे डबे वापरले जातात.