रिलायन्स जिओ (Jio) आपल्या स्वस्त मोबाईल इंटरनेट सेवेसाठी ओळखली जाते. 500 रूपयांमध्ये जिओकडून ग्राहकांना इतर कंपन्यांपेक्षा जास्त सुविधा दिल्या जातात. मात्र, तुम्हाला जिओचा यापेक्षाही स्वस्त प्लॅन हवा असेल तर तुमच्याकडे तो पर्यायही उपलब्ध आहे.
अवघ्या 100 रूपयांत उपलब्ध असणाऱ्या जिओच्या प्लॅन्समध्ये कॉलिंग आणि डेटा असा दुहेरी फायदा आहे.
100 रूपयांच्या या प्रिपेड प्लॅन्सची संख्या जास्त नसली तरी सध्याच्या घडीला बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या प्लॅन्सशी तुलना करता हे प्लॅन्स बेस्ट आहेत. मात्र, या प्लॅन्सना व्हॅलिडिटी नाही. त्यामुळे तुमच्याकडे जिओचा बेस प्लॅन असणे गरजेचे आहे.
जिओच्या 101 रुपयांच्या प्लॅनमध्ये 12 GB डेटा आणि ऑफ नेट कॉलिंगसाठी 1000 मिनीटे मोफत आहेत.
जिओच्या 51 रुपयांच्या प्लॅनमध्ये 6GB डेटा आणि ऑफ नेट कॉलिंगसाठी 500 मिनीटे मोफत आहेत. तर 21 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2GB डेटा आणि ऑफ नेट कॉलिंगसाठी 200 मिनीटे मोफत आहेत.
जिओच्या 10 रुपयांच्या प्लॅनमध्ये 124 IUC (Internet Usage Charge) मिनिटस आणि 1GB कॉम्प्लिमेंट्री डेटा मिळतो.
जिओच्या 20 रुपयांच्या प्लॅनमध्ये 49 IUC मिनिटस आणि 2GB डेटा मिळतो. तर 50 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50GB डेटा आणि 656 IUC मिनिटस मिळतात. 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये 10GB डेटा आणि 1,362 IUC मिनिटस मोफत मिळतात.