कोरोनामुळे गणेशोत्सवात श्रींच्या मूर्तीच्या उंचीवर बंधने आहेत, त्यामुळे मुर्तिकार मोठया अडचणीत सापडले आहेत.
मात्र नांदेडमध्ये बनविलेल्या गणेश मूर्त्यांना शेजारच्या तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात मागणी वाढल्याने मूर्तिकारांना काही अंशी दिलासा मिळालाय.
गणेश मूर्ती तयार करणारे नांदेडमध्ये शेकडो कुटुंब आहेत, या मूर्तिकारांना गणेश मूर्तीच्या उंचीवरचे बंधन हटवण्याची प्रतीक्षा आहे.
त्याशिवाय आमच्या डोक्यावरचे कर्ज संपणार नाही, अशी भावना मूर्तिकार व्यक्त करतायत. तसंच कोरोना आणि लॉकडाऊनने आमचं कंबरडं मोडलंय, सरकारने आमचा विचार करावा आणि आम्हाला मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.