Renault Rafale: नवी कार पाहून आठवेल राफेल एअरक्राफ्ट, पाहा कशी आहे रेनॉल्टची कूप एसयूव्ही

| Updated on: Jun 19, 2023 | 9:16 PM

Renault Rafale Coupe SUV: रेनॉल्टच्या नव्या कूप एसयुव्ही राफेल कंपनीचं फ्लॅगशिप मॉडेल आहे. ही गाडी 1934 च्या कॉड्रॉन रेनॉल्ट राफेल एअरक्राफ्टच्या आठवणींना उजाळा देते. या गाडीचा स्पीड 445 किमी प्रतितास इतका आहे.

1 / 5
फ्रेंच कार कंपनीने रेनॉल्ट कूप एसयुव्ही सादर केली आहे. ही एसयुव्ही पुढच्या वर्षी जागतिक बाजारपेठेत सादर केली जाईल. अपकमिंग कारला अग्रेसिव्ह डिझाईन आणि टेक फीचर्ससह जबरदस्त केबिनचा लूक सादर केला आहे. (Photo: Renault)

2 / 5
रेनॉल्ट राफेल कंपनीचं फ्लॅगशिप मॉडेल आहे. 1934 मध्ये कंपनीने लोकप्रिय कॉड्रॉन रेनॉल्ट राफेल एअरक्राफ्ट आणली होती. 445 किमी प्रतितास वेगाने उडणाऱ्या एअरक्राफ्टच्या आठवणीत नवी कार डेव्हलप केली आहे. (Photo: Renault)

3 / 5
राफेल कारमध्ये हायब्रिड इंजिन पॉवर वापरली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, हायब्रिड टेक्नोलॉजीद्वारे फुल टँकद्वारे 1100 किमी अंतर कापू शकते. ही गाडी नवीन डिझाईन आणि सर्वोत्तम फीचर्ससह लाँच केली आहे. (Photo: Renault)

4 / 5
पाच सीटर असलेली ही कार पॅनोरॅमिक ग्लास रूफ, 9.3 इंच हेड अप डिस्प्ले, 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांसह येते. कारमध्ये 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन देखील आहे. (Photo: Renault)

5 / 5
रेनॉल्ट राफेल कूप एसयूव्हीमध्ये स्लोपिंग रूफलाइन, लांब बोनेट, ब्लॅक ग्रिल, रुंद एअर व्हेंट्स, एलईडी हेडलाइट्स यांसारखी वैशिष्ट्ये देखील असतील. याशिवाय ब्लॅक पिलर, ओआरव्हीएम, फ्लेर्ड व्हील आर्च, स्टायलिश एरोडायनॅमिक व्हील, शार्क फिन अँटेना, टेल लॅम्प अशी विविध प्रगत वैशिष्ट्ये आहेत. (Photo: Renault)