आज पहाटे मुंबई-पुणे जुन्या महामार्गातील बोरघाटात शिंगरोबा मंदिराजवळ एक खाजगी बस दरीत कोसळून दुर्दैवी अपघात झाला.
सदर अपघाताच्या प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तिथे सुरु असलेल्या बचावकार्याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
यावेळी या बसचा अपघात नक्की कशामुळे घडला त्यामागील कारणे जाणून घेतली.
या अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करणारे हायकर्स आणि आयआरबी कंपनीच्या रेस्क्यू टीमसोबत देखील यासमयी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.
यावेळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.