Marathi News Photo gallery Revan Shinde Chalta Bolta Chaha Strong income from tea sales; Tea Seller Earns Rupees 6 lakhs per month, know how he started his business
काय सांगता, चहावाल्याची महिन्याची कमाई 6 लाख, चालत्या-बोलत्या चहाने उघडले नशीब
Revan Shinde : हा तरुण मुळचा सोलापूरचा आहे. पोटाची भूक भागविण्यासाठी तो पुण्यात आला. ज्या कंपनीत काम करत होता ती बंद पडली. त्याने सुरक्षा रक्षक म्हणून काम केले. ही नोकरी सुटल्यानंतर त्याने व्यवसायाचा मार्ग निवडला आणि नशीब घडवलं...
1 / 6
चहा हा तर भारतीयांचा वीक पॉईंट. कोणत्याही प्रसंगात चहाचे आवताण ठरलेलेच असते. चहाची दुकानं पण तितकीच आहे. आता तर आमदार, खासदार, सरपंच, उपसरपंच, नेता, लीडर असे अनेक ब्रँड बाजारात आले आहे. त्याव्यतिरिक्त अनेक चहा स्टॉल, चहा टपऱ्या नाक्या-नाक्यावर, चौका-चौकात, पार गल्लबोळात तलफ भागवतात. या चहाचा स्वाद म्हणजे एक पर्वणीच असते. काही चहावाल्यांचा गल्ला पण जबरदस्त असतो.
2 / 6
तर ही त्या तरुणाची गोष्ट आहे. जो महिन्याकाठी सहा लाख रुपये चहा विक्रीतून कमावितो. तो पुण्यात आला, तेव्हा त्याने चौकदारी केली. सुरक्षा रक्षक म्हणून काम केले. पण त्याची ही पण नोकरी हातची गेली. मग त्याने 'चालता बोलता टी' हा स्टार्टअप सुरु केला. आज त्याच्या कमाईचे गणित भलभल्यांच्या तोंडाला फेस आणणारे आहे.
3 / 6
नोकरी गेल्यानंतर त्याने कॅफे 18 नावाचे दुकान सुरु केले. कोरोना आला, लॉकडाऊन लागले आणि अवघ्या सात दिवसात त्याला दुकान बंद करावे लागले. यादरम्यान त्याच्या डोक्यावर 13 लाख रुपयांचे कर्ज झाले. तो पुरता गांगरुन गेला. काय करावे या विचाराचक्राने त्याला नवीन दिशा दिली.
4 / 6
जेव्हा इच्छा होईल, तेव्हा चहा पिण्याची तलफ भागविता आली तर, हा विचार त्याला आवडला. त्याने कॉल करा, 10 मिनिटात चहा मिळवा असा एक प्रयोग सुरु केला. त्याने हा व्यवसाय सुरु केला. 2020 मध्ये सुरुवातीला त्याला 20 कप ऑर्डर मिळाल्या. हा व्यवसाय लोकांना पण आवडला.
5 / 6
पुढे त्याला 50 ते 100 कप ऑर्डर मिळू लागल्या. अनेक ठिकाणी बल्क ऑर्डर मिळाल्या. त्याचा स्वाद आणि दर्जा अनेकांना आवडला. त्यामुळे चहाची लोकप्रियता वाढली. आज तो परिसरातील जवळपास 150 हून अधिक कार्यालयांमध्ये चहा पोहचवतो. त्याने 10 जणांना रोजगार पण दिला आहे. तो प्रत्येक दिवशी जवळपास 70 लिटर चाह तयार करतो.
6 / 6
प्रत्येक दिवशी जवळपास दीड हजार कप चहाची विक्री होते. या चहा विक्रीतून त्याला महिन्याला 6 लाख रुपयांची कमाई होते. या चहासाठीचा योग्य मसाला, दूध, ती तयार करण्याची कृती याचे सारे श्रेय रेवण शिंदे याचेच आहे. या व्यवसायात तो जोमाने उतरला आहे. योग्य व्यवस्थापनाने त्याने मैलाचा दगड गाठला आहे.