शेतकरी आंदोलनावर भाष्य करत ट्विट करणाऱ्या रिहानाबद्दल गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे. मात्र रिहाना आता एका वेगळ्या कारणानं चर्चेत आली आहे.
नुकतंच तिनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वेगळेपण म्हणजे या फोटोमध्ये रिहाना टॉपलेस दिसत आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिहानानं गळ्यात परिधान केलेल्या नेकपिसमध्ये गणपती असल्याचं दिसून येतं.
रिहाना ही एक जगप्रसिद्ध पॉपस्टार आहे.
तिनं भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा एक फोटो पोस्ट करत ‘why aren’t we talking about this?! #FarmersProtest’हे ट्विट केलं होतं. तेव्हापासून रिहाना भारतात चर्चेत होती.