बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांची आज पहिली पुण्यतिथी (Rishi Kapoor Death Anniversary) आहे. देशभरातील चाहते आज त्यांची आठवण काढत आहेत. ऋषी कपूर सुरुवातीपासूनच वेगळ्या स्वभावाचे होते. ते खूप हट्टी आणि नेहमीच आपल्या कामात व्यस्त असायचे. त्यांनी नेहमीच स्वत:कडे लक्ष दिले आणि बॉलिवूडमध्ये भरीव कामगिरी केली.
ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नीतू कपूर यांच्या घरी पोहोचले आहेत.
रणबीर व्हाईट कलरचा टी-शर्ट आणि डेनिममध्ये दिसला होता आणि त्याने कॅप कॅरी केली होती. तर आलिया भट्टने हलका गुलाबी रंगाचा सूट परिधान केला होता आणि त्यावर पांढरा प्रिंटेड स्कार्फ होता.
ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त नीतू कपूरनं घरातच पूजा ठेवली असावी ज्यामध्ये आलिया आणि रणबीर सामील झाले होते.
नीतू कपूरने आज सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्टही शेअर केली आहे.