टीम इंडिया लेजेंड्सची काल ऑस्ट्रेलिया लेजेंड्स विरुद्ध जोरदार मॅच झाली. अंतिम ओव्हरमध्ये इरफान पठानने चांगली फलंदाजी केल्यामुळे विजयी झाली.
टीम इंडिया लिजेंड्सकडून नमन ओझाने नाबाद पारी खेळली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. नाबाद 90 धावा काढल्याने चाहते एकदम खूष झाले.
इरफान पठानने काल वादळी खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजाला एका ओव्हरमध्ये तीन षटकार लगावले. त्याचबरोबर अंतिम ओव्हरमध्ये ब्रेट लीला एक षटकार लगावून विजय खेचून आणला.
कालच्या सामन्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच इरफान पठाणने मारलेले सिक्सचे व्हिडीओ अधिक आहेत.