IND vs NED : रोहितने फोडला षटकारांचा ‘बॉम्ब’, एका वर्षात इतके सिक्स मारणारा जगातील पहिलाच कॅप्टन आणि बॅट्समन
भारत आणि नेदरलँडविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला. या सामन्यामध्ये सलामीला आलेल्या रोहितने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
-
-
रोहित शर्माने एका वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि ए बी डिव्हीलियर्स यांचा विक्रम मोडलाय.
-
-
रोहित शर्माने एका वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि ए बी डिव्हीलियर्स यांचा विक्रम ए बी डिव्हीलियर्स याआधी 2015 मध्ये सर्वाधिक ५८ सिक्सर मारले होते. या यादीत ए बी नंबर वन होता, आता रोहितने टॉप मारला आहे..
-
-
दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल असून त्याने 2019 साली 56 सिक्सर मारले आहेत.
-
-
रोहितने या यादीमध्ये पहिलं स्थान गाठलं असून नेदरलँडविरूद्धच्या सामन्यात दोन सिक्स मारत एका वर्षात सर्वाधिक 60 सिक्सर मारण्याचा विक्रम केला आहे.
-
-
दरम्यान, रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 14,000 धावा पूर्ण केल्या आहेत. हिटमॅनच्या शिरपेचात मानाचे दोन तुरे रोवले गेलेत.