बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीजवळ या हंगामात काही रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. या मोसमात 8 सामने खेळताच कोहली आयपीएलमध्ये 200 सामने खेळणारा खेळाडू होईल. आतापर्यंत रोहित शर्मा आणि धोनी 200 हून अधिक आयपीएल सामने खेळले आहेत.
विराट कोहलीजवळ युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असेल. ख्रिस गेलच्या नावावर आयपीएल इतिहासात 6 शतकं आहेत तर विराटने आतपर्यंत 5 शतकं ठोकली आहेत. आणखी एक शतक ठोकून विराट गेलच्या विक्रमाशी बरोबरी करु शकतो.
आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा विराट कोहली पहिला बॅट्समन बनू शकतो. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोहलीने 5878 धावा केल्या आहेत. आणखी 122 धावा केल्यावर कोहली हा खास पराक्रम करण्यात यशस्वी होईल.
विराट कोहली टी -20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करण्यापासून केवळ 269 धावा मागे आहे. या हंगामात तो 10 हजार धावा पूर्ण करु शकतो. विराटने टी -20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 9731 धावा केल्या आहेत. जर यंदाच्या हंगामात त्याने 269 धावा केल्या तर कोहली टी -20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा पल्ला गाठणारा पहिला भारतीय फलंदाज ठरेल.
50 फिफ्टी प्लस करणारा बॅट्समन म्हणून विराटचा विक्रम होऊ शकतो. जर विराट कोहली आयपीएलच्या 6 डावांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्यास यशस्वी ठरला तर आयपीएलच्या इतिहासात 50 फिफ्टी प्लस करणारा फलंदाज होईल.