तमन्ना भाटीयाने काढला बॉयफ्रेंडच्या नावाचा टॅटू? विजय वर्माने शेअर केला फोटो
विजय वर्माने शेअर केलेल्या फोटोंमुळे तमन्ना भाटियाने आपल्या बॉयफ्रेंडच्या नावाचा टॅटू काढल्याची चर्चा पसरली आहे. फोटोंमध्ये एका व्यक्तीच्या हातावर 'विजय' असे टॅटू दिसत आहे. त्यामुळे लग्नाआधी तमन्नाने आपल्या हातावर विजयचा टॅटू काढल्याची चर्चा आहे.
1 / 8
लव्हबर्ड्स तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे रिलेशनमध्ये आहेत सर्वांनाच माहित आहे. या दोघांनीही ते बऱ्याच मुलाखतींमध्ये कबूलही केलं आहे.
2 / 8
रिपोर्टनुसार विजय आणि तमन्ना 2025 मध्ये लग्न करण्याचा प्लानही करत आहेत. पण अजून या दोघांनी यावर कोणतही भाष्य केलेलं नाही.
3 / 8
तसेच नवीन वर्षांचे सेलिब्रेशन करण्यासाठी ही जोडी सध्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे.
4 / 8
दरम्यान या सुट्ट्यांदरम्यानचे विजयने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विजय कोणाच्या तरी बाजूला बसलेला दिसत आहे. आणि त्याच्या बाजूला असलेल्या व्यक्तीच्या हातावर विजय या नावाचा टॅटू काढलेला दिसत आहे.
5 / 8
चाहत्यांना हा हात तमन्नाचा वाटत आहे. या फोटोंवरून अनेकांना कमेंटस् केल्या आहेत. पण खरं सांगायचं तर तसं नाहीये.
6 / 8
हा हात तमन्नाचा नसून फोटोग्राफर वंश विरमानी यांच्या हाताचा आहे. त्यांनी हा टॅटू काढलेला आहे.
7 / 8
दरम्यान तमन्ना आणि विजयला मनीष मल्होत्राच्या पार्टीतही स्पॉट केलं गेलं होतं. तस तमन्ना नेहमीप्रमाणे सुंदर लूकमध्येच दिसत होती तर विजय तिची काळजी घेताना दिसत होता.
8 / 8
दोघेही 'मेड फॉर इच अदर' असल्यासारखेच दिसत असल्याच्या कमेंटस् चाहत्यांनी केल्या होत्या