सध्या रशियाने केलेल्या हल्ल्यात युरोपच्या सगळ्यात मोठ्या झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला आहे.
रशियाने हल्ला केल्यानंतर अणुऊर्जा प्रकल्पातून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
रशियाने हल्ला केल्यानंतर त्यावेळी तिथं मोठा स्फोट झाला होता.
अणुऊर्जा प्रकल्पातून युक्रेनमध्ये 25 टक्के वीज देण्यात येत होती असं तिथल्या एका स्थानिक अधिका-यांनी सांगितलं आहे.
मागच्या 9 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून सध्या हल्ला अधिक तीव्रतेने करण्यात येत आहे.
रशियाने 480 क्षेपणास्त्रे डागली आहेत आणि युक्रेनच्या संरक्षण यंत्रणेने त्यापैकी अनेक क्षेपणास्त्रे पाडली आहेत. या युद्धात आतापर्यंत २२७ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे.
रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे 2000 नागरिक मारले गेले आहेत