सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कन्या दिवसानिमित्त (daughters day) मुलगी सारा तेंडुलकरसोबतचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सचिनने इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करत साराला कन्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सारा या फोटोमध्ये श्वानासोबत मस्ती करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा हा साधा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
सारा तेंडुलकर तिच्या सौंदर्य आणि लूकमुळे खूप चर्चेत असते. साराचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.
सारा तेंडुलकरचे लाखो चाहते आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.