‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री सई लोकूर नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. व्यावसायिक तीर्थदीप रॉय सोबत बेळगावमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.
या लग्नाच्या धामधुमीतही सई मात्र आपल्या लाडक्या श्वानासोबत म्हणजेच मोकासोबतच वेळ घालवताना दिसली.
लग्नाच्या धामधूमीतसुध्दा सई मोकाचे लाड पुरवण्यात व्यस्त होती.
लग्नात ‘मोका’साठी खास शेरवानी तयार करण्यात आला होता. सईने त्याच्यासोबत छानसं फोटोसेशनसुध्दा केलं.
याआधीही सईने मोका सोबतचे आपले काही व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
सई लोकूरचं तिच्या लाडक्या मोकावर खूप प्रेम आहे.
लग्नातलं सईचं हे प्राणीप्रेम अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. चाहत्यांनी तर तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.