सैफने अमृता सिंहला घटस्फोटासाठी दिले तब्बल इतके कोटी, साराचे कसे आहेत सावत्र आई करिनासोबत संबंध?
एका मुलाखतीमध्ये सैफ अली खान हा अमृता सिंहच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसला. अमृता सिंहला पोटगी म्हणून खूप मोठी रक्कम ही सैफ अली खान याला द्यावी लागलीये.
1 / 5
सैफ अली खान हा पतौडी घराण्याचा दहावा नवाब आहे. सैफ अली खान हा कायमच त्याच्या पर्सनल लाईफमुळे तूफान चर्चेत असतो. सैफ अली खान याने अमृता सिंहसोबत लग्नाच्या तेरा वर्षांनंतर घटस्फोट घेतला. मात्र, हा घटस्फोट घेणे सैफसाठी नक्कीच इतके सोपे नव्हते.
2 / 5
एका मुलाखतीमध्ये सैफ अली खान हा अमृता सिंहच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसला. अमृता सिंहला पोटगी म्हणून खूप मोठी रक्कम ही सैफ अली खान याला द्यावी लागलीये. मी अमृता सिंहला घटस्फोटानंतर 5 कोटी रूपये दिले आहेत. हेच नाही तर इब्राहिम 18 वर्षांचा झाल्यापासून त्याला महिन्याला 1 लाख रूपये द्यायचे.
3 / 5
शेवटी मी शाहरूख खान तर नाहीये..माझ्याकडे इतके पैसे नाहीत, असेही सैफ अली खानने म्हटले. सैफ अली खान हा 2005 च्या मुलाखतीमध्ये हे बोलत होता. पुढे सैफ अली खान हा म्हटला की, घटस्फोटानंतर माझ्या मुलांचे काय होईल हा विचार सतावत होता. हेच नाही तर मी बऱ्याच वेळा रडलो देखील.
4 / 5
शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या मुलांसाठी मेहनत करणार असल्याचे देखील सैफने म्हटले. सैफ अली खान हा अमृता सिंहपेक्षा तब्बल 12 वर्षे लहान आहे. तीन महिने एकमेकांना डेट केल्यानंतर यांनी लग्न केले. मात्र, लग्नाची गोष्ट अनेक दिवस यांनी लपवून ठेवली.
5 / 5
अमृता सिंहनंतर सैफ अली खान याच्या आयुष्यात करीना कपूर आली. विशेष म्हणजे सारा अली खान आणि करीना कपूर यांचे रिलेशन मैत्रिणींप्रमाणे आहे. सैफ अली खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.