बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बॉडीगार्ड हा कायम चर्चेत असतो. सध्या शेरा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
शेरा हा विधानभवानात एण्ट्री करताना दिसला.
शेरा विधानभवनात का आला आहे असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. तो कोणत्या कामानिमित्त आला होता हे समजू शकलेले नाही.
सुरक्षेच्या कारणास्तव शेरा विधानभवनात आल्याचे म्हटले जात आहे. पण नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
शेराचे विधानभवनातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा टीशर्ट आणि राखाडी रंगाची पँट घातली आहे.