तुळजापूर येथील तुळजाभवानीदेवीच्या साक्षीने व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 'स्वराज्य'च्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण करण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजी यांनी दिली आहे.
'स्वराज्य'च्या बोधचिन्ह व ध्वजाच्या अनावरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून स्वयंस्फूर्तीने अनेक सहकारी स्वराज्य कार्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते. यासर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले.
हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा #स्वराज्य असे ट्विट करत नुकतेच माजी खासदार छत्रपती संभाजी यांनी स्वराज्य संघटनेच्या बोध चिन्हाचे व ध्वजाचे अनावरण केल्याची माहिती दिली आहे
छत्रपती संभाजी यांनी तीन महिन्यापूर्वी स्वराज्य संघटनेची घोषणा केली होती . तसेच त्यातून राजकीय वाटचला करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
छत्रपती संभाजी यांना शिवसेनेचा पाठींबा न मिळाल्याने राज्यसभा खासदारकिच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती. या दरम्यान आरोप प्रत्यारोपाचे मोठे राजकीय नाट्यही रंगले होते.
स्वराज्य संघटनेची घोषणा केल्यानंतर या संघटनेचे बोधचिन्ह काय असावे तसेच ध्वज कसा असावा हे सुचविण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे त्यांनी केले होते.
स्वराज्य संघटना ही शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण , आरोग्य या विषयावर काम करणार आहे. या संघटनेची पाहिली शाखाही नुकतीच उघडण्यात आली आहे.