बायोपिकच्या शर्यतीत आता आणखी एक बायोपिक येणार आहे. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालवरील हा बायोपिक आहे.
अभिनेत्री परिणीती चोप्रा या बायोपिकमध्ये सायना नेहवालची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी परिणीती प्रचंड मेहनत घेत आहे.
सायनाने खूद्द या चित्रपटातील परिणीतीचा पहिला लूक आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'पाहा माझी डुप्लिकेट' असं कॅप्शनही सायनानं या फोटोला दिलं आहे.
परिणीतीच्या या फोटोमुळे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तसंच सायनाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.