PHOTO | चिमुकल्याच्या आग्रहाखातर जयंत पाटलांचं खास फोटो सेशन!
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचं आज एक वेगळं रुप पाहायला मिळालं. मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना एका चिमुकल्याने त्यांच्याकडे फोटो काढण्याची मागणी केली. मग जयंत पाटील यांचं खास फोटोसेशनच तिथे पार पडलं.
-
-
आपलं दमदार भाषण आणि विरोधकांना मारल्या जाणाऱ्या कोपरखळ्या यामुळे जलसंपदामंत्री जयंत पाटील नेमहीच चर्चेत असतात. त्यांच्या मिश्किल टिप्पणीमुळे अनेकदा विरोधक चांगलेच घायाळ होतात.
-
-
त्यात जयंत पाटलांचं आज एक वेगळं रुप पाहायला मिळालं. एका चिमुकल्याच्या आग्रहाखातर जयंत पाटील यांनी खास फोटोसेशन केलं!
-
-
यावेळी फोटो ग्राफर होता सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नवखेडचा राहणारा 6 वर्षाचा चिमुकला रुद्र सागर जंगम आणि मॉडेल होते खुद्द मंत्रिमहोदय!
-
-
जयंत पाटील नेहमीप्रमाणे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. मंत्र्यांचा ताफा नवखेड इथं पोहोचताच चिमुकल्या रुद्रने जयंत पाटलांकडे फोटो काढण्याची मागणी केली.
-
-
मंत्रिमहोदयांनाही चिमुकल्याचं कौतुक वाटलं आणि त्यांनी लगेच होकार दिला. त्यानंतर चिमुकल्याने जयंतरावांचे चांगले 5-6 फोटो काढले. त्यावेळी चिमुकल्या रुद्रने मंत्र्यांसमोर खास मंगलाष्टकाही बोलून दाखवली आणि सर्वांचीच वाह वाह मिळवली.