भारतामध्ये 7 वर्षांची बंदी असलेल्या या व्यक्तिला भेटली सानिया मिर्झा, हा माझा आवडता…
भारताची स्टार टेनिसपटू असलेली सानिया मिर्झा घटस्फोटामुळे चर्चेत आली आहे. आता कारण शोएब मलिक नाहीतर भारतामध्ये बॅन असलेला व्यक्ती आहे. कोण आहे तो व्यक्ती जाणून घ्या.
-
-
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सानिया आणि पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. शोएब मलिकने तिसऱ्यांदा विवाह करत सर्वांनाच धक्का दिला. या बातमीने मोठी खळबळ उडाली होती.
-
-
सानिया मिर्झा हिने स्वत: शोएब याला घटस्फोट दिला होता. त्यावेळी सानियाच्या वडिलांनी यासंदर्भात माहिती दिली होती.सानिया आता दु:ख विसरून बाहेर पडली आहे. आता सानिया अनेक ठिकाणी फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
-
-
सानिय मिर्झा परत एकदा एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. कारण त्या फोटोमधील व्यक्तीला भारतामध्ये सात वर्षांसाठी बॅन करण्यात आलं आहे. सानियाने पाकिस्तानी सिंगर अतिफ असलम याची भेट घेतली. इतकंच नाहीतर तो आवडता सिंगर असल्याचं तिने म्हटलं आहे.
-
-
2016 मधील उरी च्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या कलाकारांवर बंदी घातली होती. त्यानंतर जवळपास सात वर्षांनंतर म्हणजेच 2023 मध्ये ही बंदी हटवल्याची माहिती समजत आहे.
-
-
बंदी हटवल्यानंतर अतिफ असलम हा परत भारतामध्ये येणार असल्याची माहिती आहे. बॉलिवूड दिग्दर्शक अमित कसारिया नवीन प्रोजक्टमध्ये असलमसोबत काम करू शकतात. भारतामध्ये येण्याआधीच सानियाने अतिफ असलम याची भेट घेतल्याने तिला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे. हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.