अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते आता तिनं संक्रांती निमित्त चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
'तिळाचे तेज आणि गुळाचा गोडवा...,हे सगळं मिळो तुम्हाला ' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं त्यामुळे तुमचे लाडके कलाकार आता काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये फोटोशूट करत आहेत.
घरोघरी 'तिळगुळ घ्या गोडगोड बोला'असं म्हणत हा सण साजरा केला जातो. तसंच तुमच्या आवडत्या कलाकारांनी देखिल हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
सोनाली या काळ्या साडीत कमालीची सुंदर दिसत आहे. केसातील गजरा तिच्या सौंदर्यात भर पाडतोय.